![]() |
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव प्राथमिक शाळेजवळील सौरदिव्याची बॅटरी चोरीला गेल्यामुळे सध्या सौरदिवे बंद आवस्थेत आहेत. (छाया -सुधाकर निर्मळे)
|
पोलीसांनी बॅटरी चोरी टोळीच्या मुसक्या आवळण्याची गरज
सुधाकर निर्मळे, हातकणंगले / प्रतिनिधी
शासनाने ज्या ठिकाणी पथदिव्यांची सोय होत नाही . त्या ठिकाणी सौरदिव्यांची व्यवस्था केली. मात्र बॅटरी चोरट्यांनी सौरदिव्यांच्या बॅटरी चोरून नेल्याने फक्त सौरपथदिव्यांचे सांगाडेंचे अस्तित्वच उरले आहे. सार्वजनिक संपत्तीची चोरी करणाऱ्या टोळीचा जिल्हा पोलीस प्रमुखांनी पर्दाफाश करावा अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे.
अनुसूचित जाती , अनुसुचित जमाती, मंदिरे, समाज मंदीर , वाढीव वस्त्या, वाडया , स्मशानभूमी आदी भागात पथ दिव्यासाठी मोठा खर्चिक निधी लागतो. तो ग्रामपंचायती उपलब्ध नसल्याने विद्यूत मंडळाकडून पथदिव्यांची सोय करता येत नाही. म्हणून आदी भागात शासनाने रात्रीचा हा भाग प्रकाशित करण्याच्या उदात्त हेतूने सौर दिव्यांची व्यवस्था केली. या सौरदिव्यांची १५ ते १६ हजार किंमत आहे. प्रत्येक गावांमध्ये लोकसंख्येप्रमाणे दहा ते वीस सौर दिव्यांचा पुरवठा केला. काही वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात शासनाने या योजनेवर करोडो रुपयांचा खर्च करून वाड्या वस्त्या सौरदिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकल्या होत्या. मात्र काही महिन्यानंतर या सौरदिव्यांच्या बॅटरीमध्ये पाणी न घातल्याने सौरदिवे अप्रकाशित झाले. त्याची देखभाल ग्रामप्रचायंतीकडून झाली नाही. याचाच फायदा चोरट्यांनी उचलत बॅटऱ्या लंपास होऊ लागल्या आहेत.
हातकणंगले तालूकयातील अनेक गावातील गेल्या काही वर्षापासून असलेल्या सौरदिव्यांचे अस्तित्व सध्या संपुष्टात येत आहे. अनेक ठिकाणच्या खांबावर बल्ब बंद आवस्थेत असल्याने त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. काही खांबावरील बॅटरी व इतर साहित्य गायब झाले आहे . चोरट्यानी खांबावरिल बॅटरीसह इतर साहित्य ही गायब करण्याचा सपाटा लावला आहे.
ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांचेही सौरदिव्यांच्या खांबाकडे दुर्लक्ष झाले समाजमंदिर , स्मशानभूमी , धार्मिक मंदीरे, प्राथमिक शाळा व तेथील परिसरातील भागात व गावठाण हद्दीत सौरदिवे अतिशय उपयोगी ठरले . मराठी शाळेच्या परिसरामध्ये स्ट्रीट लाईट नसल्याने तेथील रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे . तेथे असणाऱ्या सौरदिव्याची बॅटरी चोरट्यांनी गायब केल्याने ते सध्या बंदच आहेत .बॅटऱ्या गायब होत गेल्या तरी चोरटे मोकाटच राहिले आहेत . त्यामुळे प्राथमिक शाळेकडील परिसर अंधारातच आहे . तरी ग्रामपंचायतीने या सौरदिव्यांची देखभाल व दुरूस्ती करून ते पुर्ववत सुरू करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काही वर्षापासून सौरदिव्यांची बॅटरी चोरीची टोळी कार्यरत आहे. मध्यरात्रीनंतर सहज रस्त्याकडील सौरदिव्याच्या खांबावरील बॅटरी चोरून पोबारा करीत आहेत. ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी , पोलीस प्रशासन यांच्या उदासिनतेमुळे या टोळ्या बिनधिक्कत बॅटरी चोरी करीत आहे. या बॅटरीची किंमत ५ ते६ हजार रूपये आहे. असंख्य सौरदिव्यांच्या बॅटऱ्या लंपास करून सार्वजनिक करोडो रुपयांची चोरी झाली आहे. बॅटरी चोरीची टोळी बिनधिक्कत सार्वजनिक संपत्तीवर दरोडा घालत आहे. या चोरीचे कोणालाच 'सोयर सुतक ' नसल्याचे दिसून येत आहे. या चोरीची पोलीस ठाणे मध्ये तक्रारही कोणाकडून होत नाही. सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे सर्वांचीच जबाबदारी आहे.तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशेष लक्ष घालून या टोळीला जेरबंद करुन सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करावे अशी मागणी सूज्ञ नागरिकातून होत आहे.
गावातील मराठी शाळेकडील भागात डांबावरील वीजेची सोय नसल्याने तेथील रहिवाशांना सौरदिव्यांचा मोठा आधार होता .परंतू बॅटरी व इतर साहित्य चोरीला गेल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे .जि.प. ने लाखो रुपये खर्च करून बसविलेल्या सौरदिव्यांची स्थानीक प्रशासनाने दुरुस्ती करून व देखभालीकडे लक्ष देऊन नागारीकांची गैरसोय दुर करावी. सुरेश कांबरे (शिवसेना शहरप्रमुख)
No comments:
Post a Comment