चंदगड / प्रतिनिधी
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे प्रा. सुनिल शिंत्रे यांच्यावतीने तालुक्यासह जिल्ह्यातील पहिल्या वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन केले होते. काही अपरिहार्य कारणांमुळे संमेलन लांबणीवर टाकण्यात आले असून पुढील तारीख लवकरच कळविली जाईल असे संमेलनाचे आयोजक प्रा. सुनिल शिंत्रे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी येथे येत्या 17 मे 2019 रोजी पहिले किर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या माध्यमातून संमेलनात वारकरी संप्रदायाचे काही प्रश्न, समस्या, समाज परिवर्तन व प्रबोधनसाठी या क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शनाचे नियोजन केले होते. मात्र कांहीं अपरिहार्य कारणांमुळे हे संमेलन आता लाबणीवर टाकण्यात आले आहे. या बाबत लवकरच तारीख ठरवून कळविले जाईल असे प्रा. शिंत्रे यांनी प्रसिद्धला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment