तेऊरवाडी विद्यालयात 21 वर्षानी रंगला माजी विद्यार्थी मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2019

तेऊरवाडी विद्यालयात 21 वर्षानी रंगला माजी विद्यार्थी मेळावा

तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वर्ग.
तेऊरवाडी / प्रतिनिधी 
माध्यमिक विद्यालय तेऊरवाडी (ता .चंदगड) येथे सन 1996-97 सालच्या 10 वी च्या विद्यार्थ्याच्या स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम .बी. पाटील होते .
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले . एकवीस वर्षानंतर प्रथमच विद्यार्थी मेळावा घेण्याचा उद्देश अनिल कुंभार यानी आपल्या काव्यमय प्रास्ताविकात  स्पष्ट केला. यानंतर माजी विद्यार्थी  संघटने कडून एम .बी. पाटील , एम.ए. पाटील , अशोक मेणशे , एन.एम. पाटील , एस .पी.नंदयाळकर , अजित पाटील , व्ही .डी. पाटील , सुभाष देसाई , एस .ई. पाटील , ए.एल . पाटील आदी शिक्षकांचा शाल व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला . तसेच माजी विद्यार्थिनिना माहेरची आठवण म्हणून साडी व स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला . यावेळी  या माजी विधार्थी संघटनेकडुन शाळेला लोखंडी कपाट व वहया भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या . नामदेव पाटील याने दहा हजाराची देणगी जाहिर केली . यानंतर कार्यकारी दंडाधिकारी सौ . अनिता लांडे , रमेश पाटील, जयवंत पाटील , नामदेव पाटील , नारायण पाटील आदि विद्यार्थ्यानी शालेय आठवणीना उजाळा दिला . तर एम .ए. पाटील यानी सुसंस्कारांचे बाळकडू आणि कष्ट करायची तयारी असेल तर भावी आयुष्यात प्रचंड यश मिळवता येते, संपत्तीपेक्षा माणूसकी महत्वाची असल्याचे विचार व्यक्त केले . उपस्थित सर्वच मान्यवरानी मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमाला एस .के. पाटील , टि .एम. पवार यांच्यासह आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुत्रसंचालन रामचंद्र पाटील यानी केले तर आभार अनिल कुंभार यानी मानले.



No comments:

Post a Comment