![]() |
शेखर पवार |
नेपाळ काठमांडू येथे पार पडलेल्या पावव्या आंतरराष्ट्रीय "काता कराटे "स्पर्धेत अडकूर (ता. चंदगड) येथील कु. शेखर सुधाकर पवार याने तिसरा क्रमांक मिळवत कास्यपदक मिळविले. शेखर सुधाकर पवार यांने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत "काता" प्रकारात कास्य पदकांची कमाई करत ज्ञानसागर विद्यानिकेतन हासुरवाडीच्या शाळेचे नाव उज्ज्वल केले. शेखरला एस् के ए आयचे अध्यक्ष रमेश पिसाळ, कराटे प्रशिक्षक वैभव अस्वले यांचे मार्गदर्शन व ज्ञानसागर संस्थचे अध्यक्ष सर्व पदाधीकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी व पालक यांचे प्रोत्साहन मिळाले. शेखरच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment