चंदगड / प्रतिनिधी
शिरोली (ता. चंदगड) अंतर्गत येणाऱ्या अलबादेवी, उत्साळी, सत्तेवाडी, कानडी, पोवाचीवाडी या गावासाठी स्वतंत्र तलाठी नेमणूक करावी अशी मागणी अलबादेवी ग्रामस्थांनी तहसीलदार यांचेकडे निवेदनातून केली आहे. वयोवृद्ध, अपंग, विधवा यांना विविध दाखल्यासाठी नाहक त्रास होत असून त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शाळा सुरु होणार आहे. त्यांनाही शासकीय दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होणार असून तत्पूर्वी तात्काळ तलाठ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे. निवेदनावर श्रीकांत नेवगे, उपसरपंच राजाराम पाडले,नामदेव घोळसे, विलास कोंडुस्कर, किसनाप्पा पाटील,परशराम पाडले, शिवाजी कोले,निवृत्ती डांगे, जोतिबा गोते, दत्तू पाटील व मोहन पवार यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment