चंदगड / प्रतिनिधी
दिव्यांग उन्नती अभियान या उपक्रमांतर्गत चंदगड येथे 21 मे 2019 रोजी दिव्यांगांसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तालुक्यातील लाभार्थ्यांची तपासणी व ज्या लाभार्थ्याकडे अपंग प्रमाणपत्र नाही, अशांची तपासणी करून अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर पंचायत समितीच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे.
शिबीराकरीता लाभार्थ्यांना प्रत्येक गावातून येणे करीता ग्रामपंचायतीमार्फत सोय करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिल्ली विभागाकडून अलिमको या कंपनीचे अधिकारी व तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. लाभार्थ्यांची साहित्य मागणी नोंद करून साहित्य पुरवण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत शिबिराचे प्रभावी नियोजन केले गेले आहे. या शिबीरासाठी नियोजित वेळी सर्व लाभार्थी उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत समितीच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment