किणी येथे छत्रपती संभाजी महाराज व गौतम बुध्द यांची संयुक्त जयंती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2019

किणी येथे छत्रपती संभाजी महाराज व गौतम बुध्द यांची संयुक्त जयंती उत्साहात


चंदगड / प्रतिनिधी
किणी (ता.चंदगड) येथे परिवर्तन युवा मंच यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व भगवान गौतम बुध्द यांची संयुक्त जयंती जेष्ठ नागरिक गोपाळ तरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  फोटो पुजन व दीपप्रज्वलन बबन तरवाळ, नरसू तरवाळ, विष्णू गणाचारी परशराम तरवाळ यांच्या हस्ते झाले. सामुदायिक बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी  रणजित गणाचारी (पोलीस पाटील) व यल्लापा तरवाळ (ग्रांमपंचायत सदस्य) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठल गणाचारी, भगवान गणाचारी, सुनिल तरवाळ,राहूल गणाचारी,सुनिल गणाचारी, संतोष गणाचारी, सागर तरवाळ व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन संदिप गणाचारी यांनी केले तर आभार चंद्रकांत गणाचारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment