हलकर्णी येथे वारकरी कीर्तन संमेलनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना सुनिल शिंत्रे, ॲड. संतोष मळविकर व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी येथे येत्या 17 मे रोजी जिल्ह्यातील पाहिले वारकरी कीर्तन संमेलन होणार असल्याची महीती प्रा.सुनिल शिंत्रे यानी हलकर्णी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी येथे येत्या 17 मे रोजी जिल्ह्यातील पाहिले वारकरी कीर्तन संमेलन होणार असल्याची महीती प्रा.सुनिल शिंत्रे यानी हलकर्णी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
स्वागत प्रा.पी.डी.पाटील यानी करून चंदगड आजरा गडहिग्लज विभागात वारकरी वारकरी सांप्रदायिक मोठ्या प्रमाणात वाढला आहे.चांगले किर्तनकार निर्माण होत आहेत पण त्याना व्यासपीठ मिळाले नाही या नव वारकरी मंडळींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी या किर्तन संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले प्रा. शिंत्रे पूढे म्हणाले चंदगड आजरा गडहिग्लज तालूक्यातील वारकरी संप्रदायातील विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी या किर्तन संमेलनातून प्रयत्न करता येथील असे सांगून शिंत्रे यानी वारकरी सांप्रदायातील अभ्यासक बोलावून परिसंवाद आयोजन करण्यात येणार आहे तालुक्यातील परिसरातील सर्वच कीर्तनकाराना या समेलनच्या मध्यमातून विचाराची आदान-प्रदान करता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या किर्तन संमेलनाने अध्यक्षपद जेष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख भूषविणार आहेत. यावेळी प्रा.पी.डी.पाटील.एस.डी.राजाराम.अॅड.संतोष मळविकर.पुंडलिक पाटील.परसू गावडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment