![]() |
चंदगड फाट्यावर शिवसेनेच्या वतीने दुध दरवाढी संदर्भात व पशुखादय दर कमी करण्याबाबत आंदोलन करण्यात आले. |
चंदगड / प्रातिनिधी
शिवसेनेच्या वतीने चंदगड फाटयावर दुध दरवाढी संदर्भात व पशुखादय दर कमी करण्याबाबत गोकुळच्या संचालक मंडळने योग्य निर्णय घेतला नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने गोकुळीच्या संचालक मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यानी दिला.
उपजिल्हा प्रमुख श्री. खांडेकर म्हणाले, ``गोकुळ संघावर अवलंबून असणारया दुध उत्पादकांना जो पर्यंत योग्य दुध दरवाढ मिळणार नाही व पशुखादय दर कमी होत नाहीत. तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही .यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे व संग्राम कुपेकर यानी ही आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त केली. शिवसेना उप संघटक संभाजी पाटील, संघटक संग्राम कुप्पेकर, तालुका प्रमुख अशोक मनवाडकर- अनिल दळवीउपतालुका प्रमुख उदय मंडलिक, युवा सेनेचे प्रताप पाटील, शरद गावडे, दता पाटील महिला जिल्हा उप संघटिका शांता जाधव, विधानसभा संघटिका शवेता नाईक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी व चंदगड तालुक्यात सर्व दुध उत्पादक शेतकरी, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रस्ता रोको वेळी बेळगाव वेंगुर्ला रोडवर रस्ता रोकोमुळे पाच सहा किलोमीटर पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.
No comments:
Post a Comment