कोवाड येथे सोमवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान - चंदगड लाईव्ह न्युज

05 May 2019

कोवाड येथे सोमवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

संग्रहित छायाचित्र
कालकुंद्री / प्रतिनिधी
शिवजयंती निमित्त कोवाड (ता. चंदगड) येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान सोमवारी (ता. 6) आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगिरी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष लवटे मोतीबाग तालीम कोल्हापुर यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार असून याशिवाय अनुक्रमे अजित पाटील शाहू केसरी कोल्हापूर विरुद्ध अभिजीत मानकर इचलकरंजी, बाबा रानगे भोगावती केसरी विरुद्ध प्रशांत चापगाव नॅशनल चॅम्पियन, निरुपा दड्डी मोतीबाग विरुद्ध किरण दर्गा तालीम, इंद्रजीत मगदूम विरुद्ध अमर कंग्राळी, रुपेश धर्मोजी कोवाड विरुद्ध संजय गवळी शाहू आखाडा, सागर राजगोळकर कोवाड विरुद्ध शाहरुख बेळगाव, कृष्णा कांबळे मोतीबाग विरुद्ध भीमा मोगोळकिट, निरंजन यळ्ळूर विरुद्ध शब्बीर शेख अशा चंदगड , बेळगाव , कोल्हापूर , इचलकरंजी  आदी  तालमीतील मल्लांच्या  सुमारे 100 काटा जोड आणि रंगतदार कुस्त्या होणार आहेत तरी कुस्ती शौकिनांनी रणजीत नगर येथे संपन्न होणाऱ्या मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोवाड कुस्तीगीर संघटना यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment