कालकुंद्रीत ज्ञानदीप वाचनालयाचा सातवा वर्धापनदिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

05 May 2019

कालकुंद्रीत ज्ञानदीप वाचनालयाचा सातवा वर्धापनदिन उत्साहात

कालकूंद्री ता.चंदगड येथील ज्ञानदिप वाचनालयाला  राजा शिवछत्रपती  हे पूस्तक भेट देताना युवराज पाटील बाजूला व्हि आर.पाटील, विलास शेटजी ,  एस्. एस्.खवणेवाडकर,पी.एस्. कडोलकर,  शिवाजी पाटील,सौ.वंदना  पाटील.
चंदगड /प्रतिनिधी
कालकुंद्री  (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झेविअर क्रुझ होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून एन् . एस् . गूरव व शिवाजी कोकीतकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
वाचनालयाचे सदस्य के .जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले.   प्रा.व्हि आर.पाटील, विलास शेटजी ,  एस्. एस्.खवणेवाडकर,पी.एस्. कडोलकर,  शिवाजी पाटील,सौ.वंदना विनायक पाटील.या सदस्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर सन २०१८-१९ सालात वर्षभर  वर्तमानपत्रे देणारे  सिद्दापा ईराप्पा नाईक, नारायण कुमाण्णा पाटील,  व्ही.बी.भोगण, सौ.स्वागता सुनिल कदम यांना तसेच पुस्तके ,मासिके, साप्ताहिके दिवाळीअंकभेट,अर्थिक मदत, इतर सहकार्य करणाऱ्या सर्वांना आभारपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात आले.त्यांचे आभार मानण्यात आले. या वर्षातील "उत्कृष्ट वाचक" म्हणून कु.भूषण परशुराम पाटील याचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच "दोन कवी,दोन वक्त्या" या  कार्यक्रमांतर्गंत कवी हणमंत पाटील व कवी ईराप्पा पाटील यांनी सामाजिक कविता सादर केल्या.
कु.सरिता नारायण देसाई हिचे " अजूनही जिवंत आहे माणूसकी"  व  कु.समृद्धी नरसू गुरव हिचे "धर्मवीर संभाजी महाराज" या विषयावर व्याख्याने झाली . या कार्यक्रमात श्री युवराज कल्लापा पाटील यांनी  बाबासाहेब पुरंदरे यांचे "राजा शिवछत्रपती" हे दोन खंड असणारे ग्रंथ वाचनालयाला भेट दिले. यावेळी शिवाजी कोकितकर,झेविअर क्रुझ, गुरव सर यांनी आपल्या मनोगतातून वाचनालयाच्या उपक्रमांचे व  वाटचालीचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी सैनिक शंकर कोले, अशोक वर्पे,मधुकर कोकीतकर,विठोबा मुंगूरकर,डॉ.कुपेकर (मासेवाडी),नारायण देसाई (कागणी),रवी पाटील, शंकर मुर्डेकर ,सतीश सुतार,गजानन गावडू पाटील,दीपक कालकुंद्रीकर,लोकळू पाटील,बाबू पाटील सर,अर्जुन पाटील सर,विजय शिवाजी पाटील  इ.वाचक,विद्यार्थी,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा .रवी पाटील यांनी केले व आभार श्री खवणेवाडकर यानी मानले.

फोटो ओळी :-

No comments:

Post a Comment