खासदार संजय मंडलिक यांची कानडेवाडी येथे सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2019

खासदार संजय मंडलिक यांची कानडेवाडी येथे सदिच्छा भेट

कानडेवाडी (ता. चंदगड) येथे खासदार संजय मंडलिक यांनी कुपेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना व भाजप युतीचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांनी आज कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे शिवसेनेचे संघटक संग्रामदादा कुपेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा  भेट दिली. नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचा सत्कार कुपेकर कुटुंबियांच्या वतीने  करण्यात आला. या प्रसंगी सौ. राधाराणी जाधव, सौ वंदनादेवी कुपेकर, भैय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर, सौ गंधालीदेवी कुपेकर, मंदिरा कुपेकर यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.


No comments:

Post a Comment