वैताकवाडी येथे अश्वारूढ शिवमुर्तीचे अनावरण - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2019

वैताकवाडी येथे अश्वारूढ शिवमुर्तीचे अनावरण

वैताकवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या  मुर्तीस पुष्पहार अर्पण करताना राजेश पाटील व इतर
मजरे कार्वे / प्रतिनिधी
वैताकवाडी (ता. चंदगड) येथील शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुद्राप्पा तेली होते. तालुका संघाचे चेअरमन व गोकुळचे संचालक राजेश पाटील व ताम्रपर्णी पतसंस्थेचे चेअरमन सुरेशराव चव्हाण -पाटील यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
ख्रिस्ती बांधव अधिक संख्येने राहत असलेल्या या गावात हिंदू धर्मियांची संख्या अगदीच नगण्य आहे. गावातील सर्वच धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सर्वधर्मसमभाव या विचाराने या मूर्तीची उभारणी केली आहे. या मूर्ती प्रतिष्ठापना  दरम्यान कोणतीही मिरवणूक नाही, फटाकड्या, डॉल्बी आदी गोष्टींना थारा  न देता मूर्ती प्रतिष्ठापना करून एक  वेगळा संदेश या गावाने समाजाला दिला आहे. त्यामुळे वैताकवाडी ग्रामस्थ कौतुकास पात्र ठरले आहेत. यावेळी शिवस्मारकाच्या स्लॅब चे पूजन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी केले. चौथऱ्याचे पूजन उद्योजक निवृत्ती मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या शिवस्मारकासाठी मंडळाला बक्षीस स्वरुपात मोफत जागा देणाऱ्या प्रगतशील शेतकरी लक्ष्मण पाटील यांचा गौरव करण्यात आला. राजेश पाटील, सुरेशराव चव्हाण -पाटील, रुद्रापा तेली यांनी मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी जि प सभापती नाभरमाण्णा गावडा, अभय देसाई, उपसरपंच अरुण पवार, महादेव मुर्डेकर, भालचंद्र पाटील, देवाप्पा करडे, पांडुरंग बेनके, तानाजी गडकरी, रामा दळवी, नारायण दळवी, अशोक मुळीक, प्रियंका लोबो, राजाराम सुतार, वैजू गावडे, बाबुराव पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन एम के पाटील यांनी केले आभार राजू गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment