काजुच्या नुकसानभरपाईसाठीचे आजचे उपोषण सुट्टीमुळे स्थगीत, दहा जूनला उपोषणाचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2019

काजुच्या नुकसानभरपाईसाठीचे आजचे उपोषण सुट्टीमुळे स्थगीत, दहा जूनला उपोषणाचा निर्णय


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील या वर्षी काजु उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  काजु उत्पादकांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. या मागणीसाठी बुधवारी (ता. 5) चंदगड तहसीलदार कार्यालय समोर करण्यात येणार होते. मात्र आज ईदची सुट्टी असल्यामुळे आजचे उपोषण स्थगीत करुन येत्या 10 जुन रोजी करण्यात येणार असल्याचे अनंत विष्णु पेडणेकर यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.                                                                                 
चंदगड-आजरा-गडहिंग्लज या तिन्ही तालुक्यातील काजु उत्पादकांना या हंगामात निसर्गाने हुलकावणी दिल्याने काजु पिकाच्या उत्पादनात घट झाली. शेतकरी वर्ग या हंगामात ऊस व काजु पिकाच्या आशेवर वर्षभराची उलाढाल करतो. पण या हंगामात शेतकरी वर्गाची निसर्गाने घोर निराशा केली आहे. खास करून काजु उत्पादकांना मोठा फटकाबसला आहे. यंदा काजुचे काहीच उत्पादन न झाल्याने शासनाने काजु उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी नागवे (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत विष्णु पेडणेकर हे येत्या दहा जुन रोजी चंदगड  तहसीलदार कार्यालय समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पाच जूनला उपोषण केले जाणार होते. मात्र शासकीय सुट्टीमुळे ते आता दहा जुन रोजी करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment