चंदगडचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द - खासदार श्री. मंडलिक - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2019

चंदगडचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द - खासदार श्री. मंडलिक

कोवाड येथे अविरत चालू असलेल्या हॉटेल रविराजच्या नवीन वास्तूच्या लॉजिंग, फॅमिली डायनिंग, पार्टी हॉल व शिवसेना कार्यालयाचा  शुभारंभ
कोवाड (ता. चंदगड) येेथे शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार प्रा. संजय मंडलिक, संग्राम कुपेकर व राजू रेडेकर इतर. 
च॔दगड / प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ही स्वाभिमानी जनता  विरुद्ध  धनदांडगी वृत्ती अशी  होती. शिवसेनेचा खासदार निवडून आणावा अशी  येथील सर्वसामान्य जनतेची इच्छा   होती . सर्वच पक्षातील नेत्याची मदत झाली त्या मुळे माझा विजय झाला. माझ्या वरची जबाबदारी वाढली आहे या  भागात अनेक प्रश्न आहेत ते सोडवणे आवश्यक आहे .ज्या  प्रलंबित प्रश्नामुळे लोकांना त्रास होतोय तेच प्रश्न सोडवण्यासाठी  प्राधान्यक्रम देणार असे प्रतिपादन खास.प्रा. संजय मंडलिक यानी केले. कोवाड (ता. चंदगड) येथे नव्याने सूरू झालेल्या  हाॅटेल रविराज च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
प्रस्ताविक राजू रेडेकर यांनी करून दूंडगे पूलाची रूंदी वाढवण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली. 
प्रारंभी खास.मंडलिक यांच्या हस्ते फिरत कापून हाॅटेलचा शुभारंभ करण्यांत आला.स्वागत राजू रेडेकर व सौ पूष्पा रेडेकर यानी केले. या वेळी जिल्हाप्रमुख  विजय देवणे म्हणाले ज्या भागात  हत्तीने नुकसान केलेल्या पिकांना शासनाने त्वरित  नुकसान भरपाई  द्यावी.तसेच कोवाड मधील स्मशानभूमी चा विषय हा जनआंदोलन समिती द्वारे सोडवावा असे आवाहन केले. संघटक संग्राम कुपेकर  म्हणाले  कागल मध्ये  खास.मंडलिक यांना 70 हजार तर चंदगड तालुक्यातुन 51 हजार मताधिक्य मिळाले.त्यामुळे येथील जनतेचे प्रलंबीत प्रश्न सोडवावे तसेच कोवाड दुंडगे पूलासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली. यावेळी भगवान जोशीलकर, अशोक खोत ,लक्ष्मण शहापुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.भरमू जोती रेडेकर,मारूती रेडेकर,शंकर मूर्डेकर,मारूती पाटील यावेळी उपस्थित होते. विनायक रेडेकर यांनी आभार मानले. सुत्रसंचालन अनिल गुरव यांनी केले.

No comments:

Post a Comment