चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी रमजान ईद सण उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2019

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी रमजान ईद सण उत्साहात साजरा

कालकुंद्री  (ता. चंदगड) जामा मशीद येथे ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना अशोक पाटील, श्रीकांत पाटील, के जे पाटील, अशोक वरपे , कल्लापा जोशी आदी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात मुस्लीम बांधवाचा रमजान ईद हा महत्वाचा सण तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी सामुदायिक नपाजपठण करण्यात आले. चंदगड शहरासह कोवाड, हेरे, कालकुंद्री, कुदनुर, राजगोळी, तळगुळी, दिंडलकोप, माणगाव, तुर्केवाडी, गवसे, कोरज यासह अन्य ठिकाणी रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
दरम्यान कालकुंद्री (ता. चंदगड) येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना आझाद गल्ली मस्जिद येथे जाऊन हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या. कालकुंद्री येथे हिंदू मुस्लिम सण नेहमी एकत्रितपणे साजरे केले जातात. हिंदू सणांमध्ये सुद्धा मुस्लिम बांधव नेहमी सहभागी होतात त्याची प्रचिती रमजान ईद निमित्त पुन्हा आली.
मुस्लिम बांधव ईद साजरी करत असताना कालकुंद्री जामा मस्जिद तेथे जाऊन तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष  अशोक पाटील, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, के जे पाटील, अशोक वरपे, कल्लाप्पा जोशी, पांडू कदम, कल्लाप्पा पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सदृद्दिन मोमीन ,अब्दुल मोमीन, आसिफ शेख ,इम्तियाज मोमीन, शिराज मुल्ला, फय्याज मुल्ला, अफरोज मुल्ला ,इर्शाद मोमीन, मुन्ना शेख ,मेहबूब शेख ,मल्लिक मोमीन , खाजासो मोमीन , सद्दाम मोमीन, मोहसीन मोमीन, गौस शेख आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच पद्धतीने परिसरातील कुदनुर ,कोवाड ,तळगुळी, राजगोळी खुर्द आदी ठिकाणी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या. ईद सण शांततामय वातावरणात उत्साहात पार पडला.



No comments:

Post a Comment