ठिबक योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू - तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2019

ठिबक योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू - तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांची माहिती

ई-ठिबकचे संकेतस्थळ
चंदगड / प्रतिनिधी
पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत ठिबक व तुषार सिंचन करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी mahaethibak.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ``कमीत कमी पाण्यात अधिक क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणून वाचणारे पाणी अन्य पिकांना मिळण्यासाठी शेतकऱ्याने ठिबक सिंचनचा वापर केला पाहिजे. चंदगड तालुक्यातील ऊस व काजू या प्रमुख पिकांना ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवणे हा समूह सूक्ष्म सिंचनाचा मुख्य उद्देश आहे. अनुदानाचे प्रमाण हे अल्प व अत्यल्प (5 एकरपेक्षा कमी जमीन धारणा) भुधारक शेतकऱ्यांसाठी 55 टक्के तर इतर भूधारक शेतकऱ्यांसाठी 45 टक्के आहे. अनुदान प्रस्तावासोबत शेतकऱ्यांनी मालकी हक्काचा सातबारा उतारा, 8 अ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, शेतकरी हमीपत्र, अधिकृत कंपनीचे बिल आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment