चंदगड / प्रतिनिधी
अलबादेवी (ता. चंदगड) येथील सन 2015 मध्ये केलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री, जिल्हाअधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
अलबादेवी येथे सन 2015 मध्ये छत्तीस लाख रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली होती. मात्र या योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने सरकारच्या माध्यमातून या योजनेवर केलेला खर्च वाया गेला आहे. या योजनेच्या कामाचे लेखापरीक्षण करण्यात यावे. कारण 36 लाख रुपये खर्चूनही ग्रामस्थांनी पाणी मिळत नसल्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या प्रकरणी तत्कालीन जि. प. सदस्य तात्यासाहेब देसाई-शिरोलीकर यांनीही तक्रार केली होती. हा संदर्भ निवेदनात देवुन ग्रामस्थांनी पुन्हा लक्ष वेधले आहे. या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर परशराभ चौकुळकर, उपसरपंच शामराव पाडले, यशवंत गोळसे, निलेश मोरे आदींच्या सह्या आहेत.


No comments:
Post a Comment