![]() |
चंदगड नगरपंचायत इमारत. |
चंदगड नगरपंचायतीच्या होणाऱ्या पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या नगराध्यक्षपदासाठी मुंबई मंत्रालय येथे आरक्षण काढण्यात आले. खुल्या वर्गातील महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधणारे इच्छुक नगराध्यक्षांची पंचायत झाली आहे.
युती सरकारने 2014 साली सरकारने अद्यादेश काढून तालुका व जास्त मोठी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा दिला नाही. यासाठी प्रारंभी चंदगडकरांनी नगरपंचायतीसाठी सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. त्याचबरोबर चार वेळा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. घर टू घर जावून बहिष्काराबाबत लोकांतून जनजागृती केल्याने लोक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. चंदगडकरांनी असहकार कायम ठेवल्याने अखेर सरकारने लोकांच्या भावना विचारात घेवून नगरपंचायत मंजूर केली होती.
नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आरक्षित होवून या उद्देशाने आजी-माजी सरपंच व सदस्यांनी तयारी केली होती. पण आज अखेर काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या इच्छेवर पाणी पडले आहे. खुल्या महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने स्वत:ला तर नगराध्यक्ष होता येत नाही. पण किमान नगराध्यक्ष पदासाठी पत्नीची वर्णी लागावी यासाठी पतीराजामध्ये नवा उत्साह संचारला आहे. नगरपंचायत व्हावी यासाठी सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. त्यावेळी सुजाता सातवणेकर या सरपंच होत्या. त्यामुळे नगराध्यक्षपद खुल्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने माजी सरपंच सुजाता सातवणेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रभागानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र. 1, 2, 5, 6, 12, 14 या प्रभागासाठी सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्र. 3, 10, 17 यासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. 4, 9, 13, 15, 16 – सर्वसधारण (महिला) व प्रभाग क्र. 8, 11 – नागरीकांचा मागास प्रवर्ग.
No comments:
Post a Comment