![]() |
अनिरुध्द रेडेकर |
नागरदळे येथे शिवसेना शाखा नागरदळे (ता. चंदगड )आणि केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घघाटन रेडेकर धर्मादाय रुग्णालयाचे उपाध्यक्ष व युवा नेते अनिरुद्ध रेडेकर याच्या हस्ते करण्यात आले.
" दुर्गम भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचे काम केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय उत्तमरित्या करतं आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना हाँस्पिटलचा खर्च पेलवतं नाही तरी अनिरुद्धदादांनी चंदगड तालुक्यातील मुले आरोग्यासाठी दत्तक घ्यावी. " असे प्रतिपादन युवासेना तालुका अध्यक्ष पिणु उर्फ प्रताप पाटील यांनी केले. याप्रसंगी शाखाप्रमुख परशुराम मुरकुटे, किरण कोकितकर, सुरेश पाटील, सरपंच दिलीप पाटील , लक्ष्मण मनवाडकर , गडहिंग्लज माजी उपतालुकाप्रमुख अमोल नार्वेकर, संजय संगपाळ, ग्रा.स. सोनार यांनी आभार मानले, शिबीराला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment