पाटणे फाटा येथे रविवारी चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्काराचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2019

पाटणे फाटा येथे रविवारी चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्काराचे वितरण


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
मराठी विषयासाठी योगदान, विविध उपक्रम, साहित्य संमेलनातील सहभाग, संघटनेच्या कार्यशाळेतील सहभाग साहित्य लेखन, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, संघटनेतील सक्रियता या सर्व गोष्टींचा विचार करून संघटनेमार्फत `चंदगड तालुका प्रेरणा पुरस्कार` तालुक्यातील मराठी अध्यापकाचा मान्यवरांच्या हस्ते व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालय पाटणे फाटा येथे रविवार ७ जुलै २०१९ वेळ सकाळी १० वा सत्कार होणार आहे. मराठी अध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी मराठी प्रेरणा पुरस्काराचे मानकरी कोण ठरणार हे शनिवारीच जाहीर होणार आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षकांच्यामध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.  सुंदर अक्षर हा दागिना आहे. मुलांसाठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी धडपड करणाऱ्या शिक्षकांना `हस्ताक्षर गुरु` हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे. तरी शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment