![]() |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील अनुसया पाटील यांच्या घराची कोसळलेली भिंत व छप्पर. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शिवाजी गल्लीत राहणाऱ्या श्रीमती अनुसया तातोबा पाटील यांच्या राहत्या घराची भिंत व छप्पर अतिपावसामुळे कोसळुन नुकसान झाले. ही घटना बुधवारी (३ जुलै 2019) सायंकाळी घडली. छप्पर कोसळल्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी घरामध्ये शिरले आहे. यामुळे घरातील प्रापंचिक साहित्य, कपडे, धान्य आदिंचे मोठे नुकसान झाले आहे. घटना समयी श्रीमती अनुसया पाटील या घराबाहेर असल्यामुळे अनर्थ टळला. नुकसानीचा पंचनामा तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीकडून करण्यात आला. नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. याबाबत नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment