![]() |
ॲड. संतोष मळविकर |
नंदकुमार ढेरे, चंदगड
चंदगड विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभेची निवडणुक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या दिवसेनदिवस वाढत असतानाच या अड. संतोष मळविकर यांच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुक लढविण्याचा आग्रह धरल्याने विधानसभेच्या मांदियाळीत त्यांची एंट्री झाल्यास ती सर्वांना आव्हान देणारी ठरणार!
विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्याचा कालावधी असला तरी पावसाळ्यातच निवडणुकीमधील राजकीय धुरळा उडत आहे. तालुक्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंदगड तालुक्यातून प्रा. संजय मंडलिक यांना विक्रमी मते मिळाले आहेत. या मिळालेल्या मताच्या जोरावरच विधानसभेची गणिते मांडण्यात सेना-भाजपचे इच्छुक उमेदवार गुंतले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेले हे मताधिक्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाराज मतदारांचा वाटा ही मोठा आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या इच्छुकांनी लोकसभेला मिळालेली संपुर्ण मते ही आमचीच आहेत, या भ्रमात राहु नये. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत कायम राहील हे मात्र सांगता येत नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आदि पक्षामार्फत कुणाला उमेदवारी मिळेल हे आत्ताच सांगता येत नाही. पण सोशल मिडीयावर मात्र आपलाच नेता आमदार होणार असे मेसेज व्हायरल होत आहे. विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील व गोपाऴराव पाटील, राजेश पाटील, माजी सभापती ज्योतीताई पाटील, संग्राम कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, रमेशराव रेडेकर, जि. प. सदस्य हेमंत कोलेकर, कै. केदारी रेडेकर यांचे पुत्र अनिरुद्ध रेडेकर आदि मंडळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता या इच्छुकांच्या यादीत विविध आंदोलनांच्या माध्यमातून चर्चेत आलेले ॲड. संतोष मळविकरही चर्चेत आहेत. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ॲड. मळविकर यांनीही विधानसभा लढवावी अशी मागणी होत आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन मळवीकर यांनी ही विधानसभा लढवावी अशी मागणी केली आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ॲड. मळविकर यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर हा निर्णय प्रस्थापित उमेदवारांना डोकेदुखी ठरु शकतो. याबाबत चंदगड येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. समाजासाठी अनेक आंदोलने करुन फौजदारी, अदखलपात्र गुन्हे अंगावर घेतले. नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड येथील न्यायालयात काही दावेही सुरु आहेत. जनतेच्या भल्यासाठी इतक्या केसेस अंगावर घेवून लढणारा हा कार्यकर्ता विधानसभेत गेल्यास तालुक्यातील बरेच प्रलंबित प्रश्न सुटतील. त्यामुळे अशा लढवय्या कार्यकर्यांनी हि विधानसभा लढवावी अशी मागणी केली.
ॲड. मळविकर सध्या शिवसेनेत आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी नांदवडेच्या विद्यमान सरपंच सौ. संज्योती मळविकर यांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या तुडये जि. प. मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडमुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी यावेळी त्यांनी घेतलेली मते विरोधकांना नजरअंदाज करणारी नव्हती. संज्योती मळवीकर या शिवसेनेत सद्या संघटक म्हणून उत्तम कार्य करत आहेत. या पदाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात चांगला संपर्क वाढवला आहे. त्यामुळे त्याचा फायदाही ॲड. मळविकर यांच्या उमेदवारीला होऊ शकतो. ॲड. मळविकर यांनी एव्हीएच, दौलत कारखाना, रस्ते आंदोलने, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासनाविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. हमाल, बँक मॅनेजर, वकील, सरपंच, पत्रकार, समाजसेवक ते आंदोलक अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी सर्वांनाच डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेत सर्वसामान्य लढणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच त्याच्या कामाचे फळ मिळते. चंदगड विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेली आहेत. त्यातच या मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता शिवसेनेने ॲड. मळविकर यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघाचा निकाल ही बदलू शकेल ही शक्यता नाकारता येत नाही.
![]() |
नंदकुमार ढेरे, चंदगड |
No comments:
Post a Comment