कोवाड / प्रतिनिधी
कामावरून रात्री घरी परताना वाटेत गाडी अडवून कौलगे (ता . चंदगड) येथील संजय कल्लापा पाटील (वय ३२) यांच्यावर अज्ञात व्यक्तिनी हल्ला करून लोखंडी टॉमीने त्यांना बेदम मारहान केली व हातातील बॅग घेऊन लुटारुनी पळ काढला . सोमवारी रात्री १०च्या सुमारास होसूर ते कौलगे रस्त्यावर ही घटना घडली . हल्ल्याचे कारण समजू शकले नाही . जखमी संजय पाटील यांच्यावर बेळगांव येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत . रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तिनी लुटण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची चर्चा असली तरी होसूर घाटात वारंवार असे प्रकार होत असल्याने पोलीसानी याचा छडा लावावा अशी मागणी होत आहे . संजय पाटील हे हेमरस साखर कारखान्याच्या मच्छे ( कर्नाटक ) येथील शेती कार्यालयात ओरसेल पदावर कार्यरत आहेत . सोमवारी सायंकाळी ते कामावरुन घरी दुचाकीवरू येत होते . होसूर ते कौलगे दरम्यान आल्यानंतर रस्त्याच्या कडेला झुडपात दबा धरुन बसलेल्या चौघा अज्ञातानी अचानक यांच्या गाडीचा पाठलाग केला . गाडी पाडण्याचा प्रयत्न केल्याने घाबरलेल्या अवस्थेत पाटील यांनी गाडी थांबविली . त्यावेळी चौघानीही त्याना लाथाबुक्यानी मारहान करून त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली . बॅग देण्याला प्रतिकार केल्याने त्यातील एकाने लोखंडी टॉमीने मारायला सुरवात केली . टॉमीचा डोक्यात वर्मी घाव लागल्याने पाटील रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले . त्यानंतर चारही मारेकरी दुचाकीवर पळून गेले . पळवलेली बॅग कोवाडच्या दिशेने व बॅगेतील साहित्य बेळगांवच्या दिशेने टाकून मारेकरी पसार झाले . जखमी पाटील यांनी स्वतःला सावरत आपल्या मोबाईलवरून घरी फोन केला . त्यामुळे तात्काळ त्याना कोवाड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला हालविण्यात आले .
कामावरुन घरी येताना माझ्यावर हा अचानक हल्ला झाला आहे . चोरीच्या उद्देशाने त्या अज्ञात व्यक्तिनी माझ्यावर हल्ला केला आहे . पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करावी .संजय पाटील (जखमी)
No comments:
Post a Comment