तेऊरवाडी / प्रतिनिधी
पती - पत्नीच्या अतूट नात्याची प्रचिती आज हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थाना आली. साता जन्माचा पती लाभू दे म्हणून वटसावीत्रीला वडाचे सात फेरे घेणाऱ्या पत्नीने पतीच्या निधनानंतर अवघ्या दोनच मिनिटात प्राण त्याग केला. हडलगे येथील केरबा सुबराव नाईक (वय -८०) यांचे आज सकाळी ८ वाजता वृधापकाळाने निधन झाले. पण आयुष्यभर आपल्या पतीला सुख दुःखात साथ देणाऱ्या गौराबाई केरबा नाईक (वय-७०) यांना हा धक्का सहन झाला नाही. पती निधनानंतर अवघ्या दोनच मिनिटात गौराबाईनेही आपला प्राण त्याग केला आणि हडलगे गावामध्ये एकच खळबळ उडाली. प्रत्येकजन हळहळू लागला. दोघा पती-पत्नींची अंत्ययात्रा एकाच वेळी काढून एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. पती पत्नीच्या जन्माचा शेवटच्या क्षणापर्यंतच्या अतूट नात्याची चर्चा नेसरी-कोवाड परीसरात सुरु होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment