![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठ अर्धा पाण्यात गेली आहे. |
गेले आठ दिवस सुरु असलेली पावसाची दमदार बॅटींग आजही कायम राहीली. पिसाळल्याप्रमाणे दिवसभर धो-धो पाऊस कोसळत होत्या. त्यातच सुसाट्चाया वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने चंदगड शहरासह अनेक गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे याचा फटका मोबाईल सेवेवर होवून सर्व कंपन्यांचे मोबाईल सेवा काल रात्रीपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे लोकांचा आपापसातील संपर्कही तुटला आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव, भोगोली, माळी, गवसे, कानडी, माणगाव, पिळणी, कोवाड, कुरणी हे दहा बंधारे तर चंदगड, इब्राहिमपूर, पाटणे हे तीन पुल आज सलग तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. तालुक्यातील घटप्रभा, जांबरे, जंगमहट्टी हे मध्यम प्रकल्प तर आंबेवाडी, हेरे, जुलेगडे, कळसगादे, किटवाड क्र. 1 व 2, कुमरी, पाटणे, सुंडी व काजिर्णे हे लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर दिंडलकोप, करंजगाव, खडकओहोळ, लक्कीकट्टे व निट्टूर क्र. 2 या प्रकल्पामध्ये सत्तर टक्याहून अधिक पाणीपातळी आहे. संततधार पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील भारतीय स्टेट बँकेसमोरील दुकानगाळे अर्धे पाण्यात बुडाले आहेत. |
पुरपरिस्थितीमुळे नदीकाठी असलेली पिके कुजण्याची शक्यता आहे. बेळगाव-वेगुर्ला हा दळणवळणासाठी महत्वाचा असलेला मार्ग पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने गेले दोन दिवस बंद आहे. रस्यावर आलेल्या पाण्यातून बैलगाडीतून काही स्थानिक युवक प्रवाशांना पैशाच्या मोबादल्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम करत आहेत. चंदगड आगाराच्या बाहेरगावी गेलेल्या बसेस आज दुसऱ्या दिवशीही त्या-त्या गावातच पुरामुळे अडकून पडल्या आहेत. चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील भडगाव पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक आजरामार्गे वळविण्यात आली आहे.
![]() |
कोवाड येथे भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमच्या दरवाजापर्यंत पाणी पोहोचले आहे. |
चंदगड पुलावर पाणी आल्याने हि वाहतुक पाटणे फाटा-पाटणे मार्गे वळविण्यात आली होती. मात्र पाटणे पुलावरही तीन फुटापेक्षा अधिक पाणी असल्याने हा मार्गही बंद आहे. चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे पूर्व भागातील ताम्रपर्णी नदीकाठवर असलेल्या कोवाड बाजारपेठेतील दुकानामध्ये पाणी शिरल्याने साहित्य भिजून नुकसान झाले आहे. शेती-शिवारामध्ये नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आज सकाळी आठ वाजपेर्यंत झालेल्या चोवीस तासात 101.66 मीमी तर तालुक्यात आतापर्यंत 1701.16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे कडलगे बुद्रुक, लक्कीकट्टे, देवरवाडी, कार्वे, तुडये, कलिवडे, माणगाव, कानडी, करंजगाव या नऊ गावांमध्ये पंधरा ठिकाणी घरांच्या भिंडी पडून सुमारे 3 लाख 47 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेतून कंबरबर पाण्यातून जाताना नागरीक.
4-8-19-2-
4-8-19-3- कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत पाणी शिरल्यानंतर सर्वांना सक्तीचा सुट्टी मिळाली. यावेळी तरुणांनी धो-धो पडणाऱ्या पावसात भिजत नाचण्याचा आनंद लुटला.
4-8-19-4- कोवाड येथे भारतीय स्टेट बँकेसमोरील तळमजल्यातील दुकाने पुर्णपणे पाण्यात बुडाली होती.
4-8-19-5- अतिवृष्टीमुळे कोवाड (ता. चंदगड) येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमच्या पायरीपर्यंत पाणी आले.
4-8-19-6- चंदगड येथील संपुर्ण शेतीचे शिवार पाण्याखाली गेल्याने शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते.
4-8-19-7- चंदगड-हेरे मार्गावर पाण्याची पातळी पुन्हा दिड फुटांनी वाढली. त्यामुळे हा मार्ग तिसऱ्या दिवशीही बंदच आहे.
No comments:
Post a Comment