हलकर्णी येथे माडाचे झाड अंगावर पडून महिलेचा जागीच मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2019

हलकर्णी येथे माडाचे झाड अंगावर पडून महिलेचा जागीच मृत्यू

जिजाबाई बडकू कडूकर
चंदगड / प्रतिनिधी 
शेतात काम करत असताना माडाचे झाड अंगावर पडल्याने सौ. जिजाबाई बडकू कडूकर ( वय -45) यांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी तीन वाजता गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीकाठच्या शेतात हि घटना घडली. पोलीस पाटील अंकुश पाटील यांनी चंदगड पोलीसात वर्दी दिली आहे. 
यासंदर्भात माहीती अशी – गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या शेतात जिजाबाई या अन्य दोन महिलांसोबत भात भांगलणी करीता गेल्या होत्या. दिवसभर मुसळधार पाऊस सुरुच होता. मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी माडाच्या झाडाच्या बुंध्यापर्यंत गेले होते. दुपारी तीन दरम्यान सोसाट्याचा वारा आल्याने शेताच्या बांधावर असलेले माडाचे झाड उन्मळून शेतात काम करत असलेल्या जिजाबाई  यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये त्यांच्या  जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या अन्य दोन महिला त्यांच्यापासून काही अंतरावर असल्याने बचावल्या. या घटनेने हलकर्णी गावावर शोककळा पसरली आहे. जिजाबाई यांच्या पश्चात पती, एक विवाहीत मुलगा, मुलगी, सुन असा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment