चंदगड / प्रतिनिधी
चंदगड, आजरा, गडहिंग्लज विधानसभा मतदार संघातील कै. माजी आमदार नरसिंगगराव गुरूनाथ पाटील यांचे चिरजीव राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता शिनोळी येथे आयोजित केला आहे. राज्यात व जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीला अनुसरून नरसिंगराव गटाची पुढची राजकीय दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन भिकू गावडे, बाळासाहेब कोकीतकर, मल्लिकार्जुन वाटंगी, शिवानंद हुंबरवाडी, अली मुल्ला, पोमाना पाटील, महादेव पाटील, महादेव दोरूगडे, महादेव प्रसादे, विष्णू पाटील, अनिल सुरूतकर, वैजू गावडे, गोविंद अमृस्कर, विष्णू आढाव, बाबू पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment