देशभक्तीचा प्रेरणास्रोत म्हणजे लोकमान्य टिळक - प्राचार्य व्ही.जी. तुपारे - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2019

देशभक्तीचा प्रेरणास्रोत म्हणजे लोकमान्य टिळक - प्राचार्य व्ही.जी. तुपारे

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित दिपप्रज्वलन करताना प्राचार्य श्री. तुपारे व शिक्षकवर्ग.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
"मरगळलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण करून स्वराज्याचे स्वप्न निर्माण करण्याचे महान कार्य लोकमान्य टिळकांनी केले. टिळकांच्या जहाल विचारांमूळे तरुणांच्यात उत्साह संचारला. देशभक्तीचा प्रेरणास्रोत म्हणजे लोकमान्य टिळक होय." असे प्रतिपादन प्राचार्य व्ही. जी. तुपारे यांनी केले. ते दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सृष्टी शिरसाठ हिने केले.
प्राचार्य व्ही.जी. तुपारे यांच्या हस्ते टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते बी.आर.चिगरे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे सादर करून मुलांचे मनोरंजन केलेे. कु. मंदार गायकवाड, रुपेश शेंडे, जय मांगले, राजवर्धन कांबळे, अभिषेक कांबळे, सानिका रजपूत, ऋतुजा शिंदे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला उपप्राचार्य ए.जी. बोकडे,पर्यवेक्षक एस.आर. देवण सांस्कृतिक विभाग प्रमुख टी. एस. चांदेकर व्ही. टी. पाटील, डी. जी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दर्शना वाके तर आभार कु. अश्विनी दोरुगडे हिने आभार मानले.

No comments:

Post a Comment