चंदगड / प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चंदगड नगर पंचायतची निवडणूक लढवली जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक तालुका अध्यक्ष उत्तम पाटील यांनी प्रसिद्धीला दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, चंदगड नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नगराध्यक्षसह सर्व सतरा जागा लढविल्या जाणार आहेत. यासाठी काही दिवसात जिल्हा व प्रदेशाध्यक्ष तसेच कार्यकरणीच्या उपस्थित मुलाखती घेतल्या जातील. या प्रसिद्धी पत्रकावर तालुका सरचिटणीस विजय कांबळे, संपर्क प्रमुख प्रदिप गुरव, अल्पसंख्याकचे अध्यक्ष वाहीद उर्फ जुबेर शेरखान, शहर अध्यक्ष समीर नेसरीकर, महिला शहर प्रमुख वैशाली आगलावे, उपमहिला प्रमुख कविता काजिर्णेकर, शहर महिला अल्पसंख्याक अध्यक्ष शाहीदा नेसरीकर, आजरा तालुका संपर्क प्रमुख रामदास सुपल यांची नावे आहेत.
No comments:
Post a Comment