कोवाड केंद्रात विविध उपक्रमांनी अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2019

कोवाड केंद्रात विविध उपक्रमांनी अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

केंद्र शाळा कोवाड येथे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, शिक्षक व विद्यार्थी.
कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत सर्व जि. प. शाळा व माध्यमिक शाळांत लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
 केंद्र शाळा कोवाड येथे केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांच्या हस्ते दोन्ही विभूतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या सत्तावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील इयत्ता निहाय गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे- इयत्ता पहिली लावण्या जोशी, याज्ञी आढाव, नंदिनी विनायक कुंभार, इयत्ता दुसरी रचना नरसु खोराटे, वेदांत खंडोबा पाटील, ओवी अभिजित कुंभार, इयत्ता तिसरी धीरज बागीलगेकर, मल्हार बुरुड व सिद्धार्थ वांद्रे, सिद्धार्थ मनवाडकर     व अनुष्का आढाव, इयत्ता चौथी प्रथम प्रांजल अशोक पाटील व पियुषा यादव,  द्वितीय ओमकार पाटील व वेदांती सूर्यवंशी विभागून, तृतीय  अथर्व भोगण. मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी  लघुकथा  वगनाट्य  पोवाडे  पटकथा  इत्यादी साहित्य साहित्य तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ व कामगार चळवळीतील उत्तुंग कार्याचा आढावा घेतला. कविता पाटील यांनी लोकमान्य टिळकां बद्दल माहिती सांगितली याप्रसंगी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव, केंद्रप्रमुख वाय आर निटूरकर, निवृत्त केंद्रप्रमुख विलास कांबळे,अध्यापक गणपती लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील, उज्वला नेसरकर, भावना आतवाडकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कविता पाटील यांनी केले आभार मधुमती गावस यांनी मानले.


No comments:

Post a Comment