![]() |
मुंबई येथे मंत्रालयात चंदगडच्या काजू उद्योजकांनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. |
चंदगडच्या काजू उद्योजकांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईच्या मंत्रालयातील दालनात भेट घेतली. या बैठकीत काजू उद्योगावर आकारण्यात येणाऱ्या एसजीएसटी मध्ये 100 टक्के परतावा आणि जीएसटी सुरू झाल्यापासून व्याज सवलत 5 टक्के तात्काळ देेेणेचे आश्वासन मुनगंटीवर यांनी शिष्टमंडळाला दिले. अर्थमंत्र्यांनी हे दोन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी व उद्योजकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
अर्थ व गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, कृषी सचिव, उद्योग सचिव, अर्थ सचिव, भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपीन वास्कर, सुनिल काणेकर आदी बैठकीला उपस्थित होते. जीएसटी मध्ये एसजीएसटी 100 टक्के परतावा जीएसटी सुरू झाल्यापासून मिळेल व ज्या काजू उद्याोजकांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याज रक्कमेवर 5 टक्के सवलत त्वरीत जाहीर करण्यात आली. मुनगंटीवार यांच्या सर्व सचिवांना आदेश देण्यात आले. अर्थसंकल्पावेळीही जाहीर केलेल्या 100 कोटी रूपयांची तरतूद केलेल्या निधीपैकी काही निधी काजू लागवडीला देण्यात येणार आहे. गतवर्षी काजू उद्योगाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काजू उद्योजकांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. यावेळी मुनगंटीवार व उद्योगमंत्री सुभाष देसाई व पालक मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे काजू उद्योजकांनी समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत त्यांनी सकारात्मक भूमिका घेत निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment