चंदगड / प्रतिनिधी
शिसमच्या झाडाच्या फांद्या लोखंडी मुठीच्या कोयत्याने तोडत असताना झाडाची फांदी इलेक्ट्रीक वायरवर पडून शॉक लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. प्रभाकर आप्पु सुतार (वय-50, रा. तडशिनहाळ) असे मयताचे नाव आहे. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास हि घटना घडली. राजाराम सुतार यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. प्रभाकर सुतार हे आज सकाळी पावणेदहाच्या दरम्यान तडशिनहाळ येथील जोतिबा करडे यांच्या गट नं. 257 मध्ये शेतातील शिसमच्या झाडाच्या फांदया लोखंडी कोयत्याने तोडत असताना झाडाची फांदी इलेक्ट्रीक वायरवर पडून शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. कॉ. श्री. नांगरे तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment