![]() |
कागणी- कालकुंद्री रस्ता दुरावस्थेप्रश्नी रास्ता रोको करताना ग्रामस्थ. |
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कागणी ते कालकुंद्री या प्रचंड दूरावस्थेतील रस्ता प्रश्नी भागातील ग्रामपंचायती व विविध संघटनांच्या वतीने बुधवारी (ता. 27) कागणी फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दोन डिसेंबर पासून रस्त्याच्या पुनर्बांधणीचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या नवीन दीड किमी संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत मधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. याबाबत आज परिसरातील ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे गडहिंग्लज- बेळगाव व कागणी हत्तर्गी रास्तारोको करून आंदोलन केले. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता तुषार बुरुड तसेच सासणे यांनी पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांच्या उपस्थितीत कागणी- कालकुंद्री रस्त्यासह कागणी- दड्डी, कागणी - ढोलगरवाडी सर्व रस्त्यांची साईड पट्टी, कागणी कालकुंद्री रस्त्यावरील गटर व सांडपाणी प्रश्न मार्गी लावणे यांच्यासंबंधी प्रत्यक्ष काम दोन डिसेंबर पासून रस्त्याचे पुनर्बांधणीचे ठोस लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शिवसेना ग्राहक मंच तालुकाप्रमुख राजू रेडेकर, कालकुंद्री सरपंच विनायक, कांबळे, उपसरपंच सुरेश नाईक, बाळासाहेब मुर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, जनार्दन देसाई, अशोक पाटील, शरद जोशी, विकास शेठजी, गजानन पाटील, एस. जी.पाटील आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विविध संघटना व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment