कोवाड येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर उत्साहात, चंदगड तालुक्यात पहिले मार्गदर्शन केंद्र - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2019

कोवाड येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर उत्साहात, चंदगड तालुक्यात पहिले मार्गदर्शन केंद्र

कोवाड (ता. चंदगड) येथे यशोज्योत स्पर्धा परिक्षा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करताना जे. बी. पाटील, प्राचार्य जांभळे, विनायक रेडेकर, नागेद्र मूतकेकर आदी.
चंदगड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व यशोज्योत स्पर्धा परिक्षा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात मोफत कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला   स्पर्धा परिक्षेद्वारे विविध पदावर  अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्यांशी यावेळी विद्यार्थ्यांना प्रथमच संवाद साधून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेतील क्लृप्त्या यावेळी जाणून घेतल्या. 
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक विनायक रेडेकर 
सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षस्थतेखाली झालेल्या कार्यक्रमात  प्रबोधनीच्या नाम फलकाचे अनावरण जे. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. एम. व्ही. पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. सामाजिक कार्यकर्ते राजू रेडेकर यांनी प्रास्ताविक करून ग्रामीण भागातील मुलांनी प्रशासनात भावी अधिकारी घडवण्यासाठी प्रबोधिनी सुरु केली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे अवाहन केले.  कुदनुर गावचे सुपुत्र व गडहिंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर म्हणाले, ``दहावी ते पदवीची चार वर्षे आपण कशी घालवणार यावर आपल्या 40 वर्षाचे जीवन अवलंबून असून जिद्द चिकाटी प्रामाणिक प्रयत्न व योग्य मार्गदर्शन असेल तर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो.`` जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  अमोल पवार (औषध निर्माण अधिकारी)  नागनाथ ढवळे (अॅग्री ऑफिसर बँक ऑफ बडोदा)  अक्षय जमदाडे व निलेश जमदाडे (सीआयडी पीएसआय)  सागर मुतकेकर  कमलेश जाधव ,पो.नि.उपनिरीक्षक प्रमोद वाघ,   मुकेश कांबळे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विनायक रेडेकर यांनी यावेळी  मार्गदर्शन केले.  सूत्रसंचालन यांनी केले आभार कुमारी श्रेया रेडेकर हिने मानले.
ग्रामीण भागात प्रचंड गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी न्यूनगंड आहे. विद्यार्थ्यांना  योग्य दिशा देण्यासाठी तालुक्यात यापुढे यशोज्योत फौडेंशन दीपस्तंभ म्हणून कार्य करेल असे विनायक रेडेकर यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment