सतेज कृषी प्रदर्शनासाठी कोल्हापूर येथे मंडप उभारणी कामाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2019

सतेज कृषी प्रदर्शनासाठी कोल्हापूर येथे मंडप उभारणी कामाचा शुभारंभ


कोल्हापूर /  प्रतिनिधी
शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती व शेतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावी. यासाठी आमदार सतेज पाटील यांच्यावतीने  कोल्हापूर येथे दरवर्षी सतेज कृषी प्रदर्शन भरवण्यात येते. यावर्षी  हे प्रदर्शन ६ ते ९  डिसेंबर दरम्यान तपोवन मैदानावर होणार आहे. या प्रदर्शनासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. महापौर सुरमंजरी लाटकर व उपमहापौर संजय मोहीते यांच्या उपस्थितीत आज मंडप उभारणीचा शुभारंभ झाला.
शेतीतील नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून "सतेज कृषी" प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येते. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर घेण्यात येणाऱ्या  या प्रदर्शनासाठी भव्य मंडप उभारला जातो. या मंडप उभारणीचा शुभारंभ आज सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी महापौर सुरमंजीरी लाटकर, उपमहापौर संजय मोहीते, नगरसेविका प्रतिक्षा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. ६  ते ९ डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे  शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी महत्वाची औजारे, औषधे, कमी खर्चात शेती कशी करावी याबाबतची माहिती दिली जाते.

No comments:

Post a Comment