चंदगड येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी जिलेबी वाटून केला आनंद साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2019

चंदगड येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी जिलेबी वाटून केला आनंद साजरा

मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जिलेबी वाटून आनंद साजरा केला. 
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शपथ घेतली. याबदद्ल चंदगड शहरात आज आनंद साजरा करण्यात आला. चंदगड शहरातील शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंदगड येथील संभाजी चौकात एकमेकाला जिलेबी वाटप व फटाक्यांची आतीषबाजी करुन आनंद साजरा केला. यावेळी हा आवाज कोणाचा - शिवसेनेचा, कोण आला रे, कोण आला शिवसेनेचे वाघ आला, मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी फिरोज मुल्ला, शरद गावडे, सकलेन नाईक, विशाल गायकवाड, भोसले, विरेंद्र कांबळे, राहुल हळीज्वाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment