एकवीसाच्या शतकात विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा - केंद्रप्रमुख श्री. निट्टूरकर - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2019

एकवीसाच्या शतकात विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा - केंद्रप्रमुख श्री. निट्टूरकर


कालकु्ंद्री / प्रतिनिधी
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासावी. यासाठी शिक्षकांनी त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा. प्रथम शिक्षकाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कालकुंद्री व कोवाडचे केंद्रप्रमुख वाय. आर. निटूरकर यांनी व्यक्त केले. ते श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे आयोजित 'विज्ञान मेळावा २०१९' च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य सी बी निर्मळकर होते.
प्रास्ताविक बी. ए. तुपारे यांनी केले या विज्ञान मिळाव्यात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 55 उपकरणांची मांडणी केली होती. प्राचार्य निर्मलकर यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वैज्ञानिक प्रयोग प्रयोगांचे कौतुक केले. यावेळी झालेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. याप्रसंगी कालकुंद्री चे सरपंच विनायक कांबळे शाळा समितीचे सदस्य एम.बी. पाटील, आर.आर. देसाई, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील, शंकर कोले, विजय कोकितकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. व्ही जाधव, प्रशांत कोकितकर, अमोल तळवार, अर्चना पाटील, आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ई. एल. पाटील यांनी केले.


No comments:

Post a Comment