कालकुंद्री / प्रतिनिधी
तुडये केंद्रांतर्गत वि. मं. मळवी शाळेच्या क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत म्हाळुंगे खालसा शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. वरिष्ठ गट कबड्डी मुली प्रथम, खो-खो दितीय. १०० मी., २०० मीटर धावणे व लांब उडीत ममता मयांना गावडे प्रथम.तर सहाशे मी. धावणे तृतीय, उंच उडी ललिता सोमनाथ गावडे तृतीय, गोळाफेक व थाळीफेक मध्ये माऊली गावस दितीय, गोळाफेक नागराज गावडे तृतीय १०० व २०० मी धावणे रोहन डांगे दितीय, कुस्ती ३५ किलो गट। मुली माया गावडे प्रथम,३० किलो मुले प्रणव पाटील द्वितीय कनिष्ठ गट तेजस दळवी लांब उडी व ५० मी धावणे, उंच ऊडी द्वितीय, तनुजा गावडे प्रथम. लांब उडी मयुरी पाटील द्वितीय. सर्व खेळाडूंना केंद्रप्रमुख वाय.के. चौधरी, मुख्याध्यापक तुकाराम पाटील, शिवाजी नार्वेकर, विठोबा मंगुरकर, शिराज देशपाईक आदींचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment