इको केन शुगर्सने उर्वरीत देणी न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा – ॲड. संतोष मळविकर - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2019

इको केन शुगर्सने उर्वरीत देणी न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा – ॲड. संतोष मळविकर

इको केन शुगर्सने शेतकऱ्यांची मागील उर्वरीत देणी द्यावीत, या मागणीसाठी तहसिलदार विनोद रणवरे यांना निवेदन. 
चंदगड / प्रतिनिधी
म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील इको केन शुगर्सने या साखर कारखान्याने जाहीर केलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कारखान्याला टाळे ठोकू असा इशारा ॲड. संतोष मळविकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसिलदार विनोद रणवरे यांना दिले आहे. 
सन 2018 - 19 मध्ये 2800 रुपये दर जाहीर केला होता. त्यापैकी 2647 रुपये शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरीत 153 रु मिळायचे आहेत. 2017-18  मध्ये 3 हजार रुपये दर जाहीर केले होते, त्यापैकी काही शेतकऱ्यांना 2500  तर काही शेतकऱ्यांना 2800 रु मिळाले आहेत. सन 2016-17 मधील प्रतीटन 75 रुपये शिल्लक आहेत. कारखाना चालू करताना फक्त आश्वासन दिली जातात आणि संधी मिळताच शेतकऱ्यांच्या बिलाकडे कानाडोळा केला जातो. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांची देणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत अन्यथा ऊस गाळप बंद पाडून कारखान्याला टाळे ठोकू असा इशारा ॲड. संतोष मळविकर यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनानतून दिला आहे. यावेळी ॲड. मळविकर यांच्यासह प्रा. एन. एस. पाटील, फिरोज मुल्ला, सिकंदर नाईक, श्रीकांत कांबळे उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment