ऒलम कारखान्याकडुन चालु गळित हंगामातील एकरकमी एफआरपी सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार - भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2019

ऒलम कारखान्याकडुन चालु गळित हंगामातील एकरकमी एफआरपी सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार - भरत कुंडल

भरत कुंडल
कोवाड / प्रतिनिधी
कार्यक्षेत्रातील उद्भवलेल्या पुर परिस्थीचा व अवकाळी पावसामुळे आडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विचार करुन राजगोळी खुर्द (ता. चदंगड) येथील ओलम ॲग्रो (हेमरस) साखर कारखान्याकडून सन २०१९-२० या हंगामातील २५ नोंव्हेबर २०१९ अखेर ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना चालु हंगामातील तोडणी वाहतुक वजा जाता देय असणारी एफ. आर. पी. ची संपुर्ण रक्कम एकरकमी २८४५ रुपये प्रती मेट्रीक टनाप्रमाणे सोमवार २ डिसेंबर २०१९ रोजी संबधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रमुख भरत कुंडल यांनी दिली. 
कारखान्याचे प्रमुख श्री. कुंडल पुढे म्हणाले, ``चंदगड, गडहिंग्लज, आजरा परिसरातील अन्य कारखान्याच्या तुलनेत गेल्या नऊ वर्षापासुन ओलम (हेमरस) साखर कारखान्याने वेळेत व उच्चांकी ऊस दर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्याचबरोबर कारखान्यामार्फत ऊस विकासात्मक विविध योजना राबवुन शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीकरिता विशेष सहकार्य करत कार्यक्षेत्रातील १६५० शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पुणे येथे तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण दिले आहे. वेळोवेळी वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पुणे येथील शास्त्राज्ञानामार्फत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जावुन मार्गदर्शन केले आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस ओलम (हेमरस) कारखान्याला पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन श्री. कुंडल यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment