कुदनुर पंचायत समिती गणस्तरीय वार्षिक आराखडा कार्यशाळा
![]()  | 
| कोवाड येथे कुदनुर पंस गण स्तरीय वार्षिक आराखडा कार्यशाळेत बोलताना राजेंद्र तळपे, सोबत महादेव संगावकर, सरपंच अनिता भोगण, विष्णू आडाव, पी एस भोगण आदी. | 
कालकुंद्री / प्रतिनिधी
शासनाचा पंधरावा वित्त आयोग निधी लवकरच सर्व ग्रामपंचायतींना प्राप्त होणार असून त्याचे विनियोग आराखडे दहा डिसेंबर पर्यंत विशेष ग्रामसभेत तयार करून ३१ डिसेंबर अखेर ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती चंदगडकडे सादर करावेत असे आवाहन विस्ताराधिकारी (ग्रामपं) राजेंद्र तळपे  यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या वार्षिक आराखडा कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी कोवाड सरपंच अनिता भोगण होत्या.
उपसरपंच विष्णू आडाव यांनी स्वागत केले. यावेळी तळपे पुढे म्हणाले, ``पंधराव्या वित्त आयोगातील प्राप्त निधी पाच वर्षात विभागून तो महिला बालकल्याण, शिक्षण व आरोग्य, जि. प. शाळा, अंगणवाडी यांना भौतिक सुविधा पुरवणे व गावातील इतर विकासकामांसाठी टक्केवारी व प्राधान्यक्रमानुसार वापरावा असे सांगितले.`` कनिष्ठ अभियंता सांगावकर यांनी मार्गदर्शन केले. पंचवार्षिक पंधराव्या वित्त आयोगातून सन २०२० ते २४ साठी गणातील कोवाड ६० लाख, कुदनूर ८२, कामेवाडी २४ लाख, तेऊरवाडी ३४ लाख, राजगोळी बुद्रुक ५२ लाख, राजगोळी खुर्द ७८ लाख, घुलेवाडी २४ लाख, कागणी ४४ लाख, निटूर ५२ लाख अशाप्रकारे सर्वच गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात अंदाजित निधी मंजूर असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कुदनुर गणातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, जि प शाळा मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. पी. एस. भोगण यांनी आभार मानले.


No comments:
Post a Comment