मुख्यमंत्री उध्दव ठाकरे |
मुंबई / प्रतिनिधी
गेल्या महिनाभर राज्यात सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज अखेर शिवेसना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारन 169 मतांनी बहुताची परिक्षा आज पास केली. नूतन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारवरील विश्वास ठराव बहुमताच्या जोरावर जिंकला.
शिवेसना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी बैठकावर बैठका होवून निर्णयापर्यंत पोहोचण्याचे काम सुरु होते. मात्र त्याच दरम्यान एक रात्रीत अचानकपणे भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना घेवून सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र भाजचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बहुमत सिध्द करण्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री व देवेद्रे फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला. दोन दिवसापूर्वी नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली.
राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार सभागृह सुरू झाल्यानंतर सुरुवातीचं कामकाज आटोपल्यानंतर काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधारी बाकावरील आमदार नवाब मलिक, जयंत पाटील व सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आले. मतदान सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून गणती करण्यात आली. विश्वास ठरावाच्या बाजूनं १६९ मतं पडली आणि हा ठराव उद्धव ठाकरे सरकारनं जिंकला.
No comments:
Post a Comment