भगतसिंग अकॅडमीची अश्विनी गावडे रेल्वे सुरक्षा दलामध्ये भरती, तालुक्यातील पहिली विद्यार्थ्यींनी - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2019

भगतसिंग अकॅडमीची अश्विनी गावडे रेल्वे सुरक्षा दलामध्ये भरती, तालुक्यातील पहिली विद्यार्थ्यींनी

भगतसिंग अकॅडमीची विद्यार्थ्यींनी अश्विनी गावडे रेल्वे सुरक्षा दलामध्ये भरती झाल्याबद्दल तिचा सत्कार करताना माजी सभापती शांताराम पाटील, बाजुला अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक भारत गावडे, निवृत्ती हारकारे व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील भगतसिंग अकॅडमीची विद्यार्थिनी अश्विनी परशराम गावडे (रा. असगाव) हिची रेल्वे सुरक्षा दलामध्ये निवड झाली आहे. चंदगड तालुक्यातून रेल्वे सुरक्षा दलामध्ये निवड होणारी ती पहिलीच विद्यार्थ्यांनी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचा माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील यांच्या हस्ते झाला.
भगतसिंग अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक भारत गावडे यांच्यासह आर. डी. पाटील, अनंत धोत्रे, हॉलीबॉल नॅशनल रेफ्री शिवाजी पाटील, पत्रकार निवृत्ती हारकारे, अश्विनीचे वडील परशराम गावडे यांच्यासह भगतसिंग अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. सचिन पिटूक यांनी सुत्रसंचालक केले. अनंत धोत्रे यांनी आभार मानले. 


No comments:

Post a Comment