![]() |
महाराष्ट्र राज्यात सर्वोत्तम खत विक्रिचा प्रथम पुरस्कार स्विकारताना चेअरमन, आमदार राजेश पाटील सोबत संचालक तानाजी गडकरी , डॉ . योगेश म्हसे, एस. वाय. पाटील. |
तुर्केवाडी / प्रतिनिधी
चेअरमन तथा आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तुर्केवाडी (ता. चंदगड) यांना सर्वोत्कृष्ट खत विक्रीकरिता दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. या अगोदर याच संघाला मानाचा सहकार भूषण व अटल महापणन पुरस्कारा पाठोपाठ चंदगड तालुक्याच्या व शेतकरी संघाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला .उत्तम नेतृत्व कौशल्य दाखवून आमदार राजेश पाटील यानी दोन वर्षांमध्ये सलग तीन पुरस्कार तालुक्यासाठी मिळवून दिले. पुरस्कार स्वीकारताना चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आमदार राजेश नरसिंगराव पाटील, डॉ. योगेश म्हसे व्यवस्थापक संचालक, मनोहर पाटील जिल्हा मार्केटिंग अधिकारी, संघाचे संचालक तानाजी गडकरी, मॅनेजर एस. वाय. पाटील, जिल्हा शेतकरी संघाचे संचालक विनोद पाटील अपस्थित होते. या तालुका संघाच्या दैदिप्यमान वाटचालीमध्ये तालुका संघाचे चेअरमना बरोबर त्यांचे संचालक मंडळ तसेच संघाचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे ही अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडीनंतर मिळालेल्या या पुरस्कारामुळे तालुक्यात व तालुका संघाच्या सभासद तसेच हितचिंतकामध्ये आनंदी वातावरण पसरलेले आहे. या कामगिरीबद्दल संघाचे चेअरमन संचालक मंडळ कर्मचारी व सभासद या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment