चंदगड ते वैजनाथ देवालय पायी दिंडीला शुक्रवार पासून प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2019

चंदगड ते वैजनाथ देवालय पायी दिंडीला शुक्रवार पासून प्रारंभ


कार्वे / प्रतिनिधी
चंदगड येथील देव रवळनाथ मंदिर ते देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवालय दरम्यानच्या पायी दिंडीचे शुक्रवार 6  डिसेंबर ते सोमवार 8 डिसेंम्बर 2019 अखेर आयोजन करण्यात आले आहे.
6 डिसेंबर 2019 रोजी दुपारी तीन वाजता हभप पांडुरंग गोंधळी व चंद्रकांत वणकुंद्रे यांच्या हस्ते ध्वज मुहूर्तमेढ उभारून सोहळ्यास प्रारंभ होईल. सांयकाळी 6 ते 7.30 वाजता हभप आप्पा वैजू गावडे व हभप संभाजी चिरमुरकर यांचे प्रवचन होणार आहे. रात्री 8 वाजता हभप पुंडलिक पाटील यांचे कीर्तन आहे. शनिवारी 7 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 4 वाजता काकडा आरतीने सोहळ्याची होणार आहे. नरेवाडी येथील सईमदेव मंदिर येथे या पायी दिंडीचा पहिला मुक्काम होणार आहे. या दिवशी सायंकाळी 6 वाजता हभप मायाप्पा पाटील व हभप दत्ता देशमुख यांचे प्रवचन व रात्री 8 वाजता हभप तुकाराम वाईंगडे यांचे कीर्तनाने आयोजन आहे. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 5 वाजता  काकडा आरतीने दिनचर्येला सुरुवात होणार असून या वेळी पायी दिंडी वैजनाथ देवालयाकडे वाटचाल करणार आहे. सायंकाळी पाच वाजता दिंडी वैजनाथ येथे  आगमन करेल.  यादिवशी सायंकाळी सहा वाजता हभप वैजनाथ कांबळे व हभप बाळासाहेब मेणसे यांचे प्रवचन व रात्री 7  ते 9 या दरम्यान हभप विठ्ठल गावडे यांचे कीर्तन होईल. सोमवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता काकडा आरती होणार आहे. सकाळी 8 वाजता हभप संभाजी चिरमुरकर यांचे काला कीर्तन होईल. सकाळी 10 ते 12 या दरम्यान महाप्रसाद होणार असून या पायी दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हभप गुंडू पांडुरंग पाटील व सचिव हभप संभाजी चिरमुरकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment