आमरोळी येथील भरमु नांगनुरकर यांची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या कुलाबा विभाग संघटकपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2019

आमरोळी येथील भरमु नांगनुरकर यांची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या कुलाबा विभाग संघटकपदी निवड

 
भरमु नांगनुरकर
चंदगड / प्रतिनिधी
आमरोळी (ता. चंदगड) येथील व सद्या मुंबईमध्ये कामानिमित्त वास्तव्याला असलेले भरमु नांगनुरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना कुलाबा विभाग संघटकपदी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे याच्या आदेशाने निवड करण्यात आली. या निवडीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय भाई नाईक व महाराष्ट्र उपाअध्यक्ष अरविंद दादा गावडे, शेखर भाई गव्हाणे, प्रशांत गांधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पक्षाशी ठेवलेला प्रामाणिकपणा व वेळोवेळी नागरिकांच्या सामाजिक कार्यासाठी केलेल्या योगदानामुळेच पक्षाध्यक्ष यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला तो कधीही ढळु देणार नाही असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री. नांगनूरकर यांनी सांगितले. 
 

No comments:

Post a Comment