चंदगड नगरपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा एकमुखी निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2019

चंदगड नगरपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा एकमुखी निर्णय


चंदगड नगरपंचायत
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहराच्या पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या सर्व नगरवाशियांच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुक लढविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आला.
चंदगडच्या शहराच्या   सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी  सर्व लोकांना  सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचे बैठकीत ठरले. नगरपंचायत कृती समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी लोकलढा उभारण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना यश आले. यावेळी चंदगड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा नगरपंचायत कृती समिती संघर्ष प्रमुख शिवानंद उर्फ आण्णाप्पा हुंबरवाडी, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, गुंडोपंत कुंभार, माजी सरपंच उर्फ बाळ पिळणकर, बाळासाहेब हळदणकर, अल्लीसो मुल्ला, विठोबा गुळामकर, श्री. मुळीक, प्रविण वाटंगी, संजय चंदगडकर, श्रीकांत देसाई,  संजय कुंभार, बाबु मुल्ला,  सतार शहा, सल्लाऊद्दीन नाईक, युसूफ शेरखाँन, बाबू बाळा हळदणकर, नामदेव लोहार, सुधीर पिळणकर, तजमुल फणीबंद, अभिजीत गुरबे आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment