आजाराला कंटाळून पाटणे येथील एकाची आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2019

आजाराला कंटाळून पाटणे येथील एकाची आत्महत्या

राजाराम वांद्रे

चंदगड / प्रतिनिधी
आजाराला कंटाळल्याने विषारी औषध सेवन करुन एकाने आत्महत्या केली. राजाराम शंकर वांद्रे (वय-50, रा. पाटणे, ता. चंदगड) असे मयताचे नाव आहे. आज दुपारी बारा वाजता हि घटना घडली. बहीण सुनैना गवस (रा. चंदगड) यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – सुनैना गवस यांचे सख्खे भाऊ राजाराम वांद्रे हे कोणत्यातरी आजाराने त्रस्त होते. याच आजाराला कंटाळून त्यांनी आज दुपारी बारा वाजता विषारी औधष प्राषण केले. नातेवाईकांना हि माहीती मिळताच त्यांना तातडीने बेळगाव येथील सीव्हील रुग्णांलयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. का. श्री. पाटील तपास करत आहेत.
 
 

No comments:

Post a Comment