कोवाड महावितरण कार्यालयावर बिलाबाबत गुरुवारी मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2019

कोवाड महावितरण कार्यालयावर बिलाबाबत गुरुवारी मोर्चा

कोवाड (ता. चंदगड) येथील महावितरण कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे निवेदन देताना शेतकरी.

कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील महावितरण कार्यालयाकडून पावसाळ्यात आलेल्या महापूराच्या काळात शेतकऱ्यांनी शेतातील वीजेवर चालणाऱ्या मोटरचा वापर केला नसतानाही महावितरण कडून शेतकऱ्यांना भरमसाठ बीले पाठवली आहेत, हे अन्यायकारक आहे. याविरोधात कोवाड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी गुरुवारी 5 डिसेंबर 2019 रोजी सकाळी अकरा वाजता कोवाड येथील महावितरण कार्यालयावर अन्यायकारक बीले रद्द करावीत. यासाठी मोर्चाचे नियोजन करत असल्याचे निवेदन महावितरणच्या आधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर कोवाड पंचक्रोशीतील नागरीकांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment